Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईतून सुमारे ५०२ कोटी रुपयांचा कोकेनचा अवैध साठा जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची मोठी कारवाई

नवी मुंबई, दि. ८ : महसूल गुप्तवार्ता संचालनालयान आज दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी जारी केलेल्या निवेदनानुसार दक्षिण आफ्रिकेतून आयात होत असलेला सुमारे पाचशे दोन कोटी रुपये किंमतीचा कोकेनचा अवैध साठा जप्त केला आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतून पेअर आणि नास्पती या फळांनी भरलेल्या एका कंटेनरची वाहतूक ६ ऑक्टोबर २०२२ रोजी न्हावाशेवा येथे संशयावरून रोखण्यात आली. या कंटेनरची तपासणी केली असता त्यात खोक्यांमध्ये या फळांच्या आड प्रत्येकी सुमारे एक किलोग्रॅम वजनाच्या उच्च दर्जाच्या कोकेन पासून बनवलेल्या विटा लपवलेल्या आढळून आल्या. या ५०.२३ किलोग्रॅम वजनाच्या ५० विटांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत ५०२ कोटी रुपये असल्याचं तपासाअंती निदर्शनास आलं.

दक्षिण आफ्रिकेतून याआधी आयात करण्यात आलेल्या संत्र्यांच्या आड लपवून आणलेला १९८ किलोग्राम मेथ आणि ९ किलोग्राम कोकेन साठ्याच्या तस्करीप्रकरणी वाशी येथे महसूल गुप्तवार्ता संचालनालयान जप्त केलेल्या घटनेत अटक करण्यात आलेल्या आरोपीच्याच नावाने ही अवैध तस्करीही होत असल्याचं आढळून आलं आहे. गेल्या काही दिवसात समुद्री मार्गाने कंटेनर मधून तस्करी करण्यात येत असलेला हा आणखी एक मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

एनडीपीएस कायदा १९८५ नुसार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई प्विभागीय युनिटकडून गेल्या दहा दिवसात १९८ किलो मेथामफेटामाईन आणि ९ किलो कोकेन ते १६ किलो हेरॉईन असे अंमली पदार्थांचे मोठे साठे गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत जप्त करण्यात आले आहेत.

सूत्र :- महसूल गुप्तवार्ता संचालनालय

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *