मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी २ वाजता साधणार जनतेशी संवाद; पालघर जमावहिंसा प्रकरणी करू शकतात भाष्य
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात दुपारी २ वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. याबाबत ची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण कालच फेसबुक लाईव्ह आल्यानंतर आज अचानक पुनः एकदा मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत असल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशी अटकळ आहे की मुख्यमंत्री ठाकरे पालघर येथील जमावाच्या मारहाण प्रकरणावर भाष्य करणार आहेत. याबाबत काल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती.
