अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर जाणार
मुंबई, दि.१७: राज्यातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या सोमवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. गेले दोन दिवस विरोधकांकडून विशेषतः भाजपकडून वारंवार ही मागणी करण्यात येत होती.
सोमवारी सकाळी ते अक्कलकोट तालुक्यात सांगवी खूर्द इथं नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी आणि ग्रामस्थांशी चर्चा करतील. त्यानंतर अक्कलकोट, रामपूर, बोरी उमरगे, इत्यादी ठिकाणी आपत्तीग्रस्त घरांची आणि शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी, करणार आहेत.
