Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ला लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली तत्काळ दखला

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ला लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली तत्काळ दखला

पुणे, दि. २१: कोव्हिशिल्ड लसीची निर्माती कंपनी असलेल्या पुण्याच्या ‘सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया’ च्या एका इमारतीला  आज दुपारी आग लागली. या आगीत इमारतीचे काही मजले भक्ष्यस्थानी पडले आहेत. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेऊन पुण्यातील यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यासाठी  उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले. आता आग आटोक्यात आली असून केंद्र सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आगीच्या या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच मनपा आयुक्तांकडून  माहिती घेतानाच आग आटोक्यात आणण्यासाठी आणि आवश्यकता भासल्यास मदत व अनुषंगिक आपत्कालीन उपाययोजना राबविण्यात याव्यात निर्देश दिले.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरू केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्लँटला लागलेल्या आगीचे वृत्त समजताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील संसद सदस्यांच्या समवेत सुरू असलेल्या बैठकीतूनच या घटनेची दखल घेतली व तातडीने कृती करण्याच्या सूचना दिल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *