सिडको गृहनिर्माण योजनांतील घरांचे हफ्ते भरण्यास आणखीन तीन महिन्यांनी मुदतवाढ
नवी मुंबई: जगभर सर्वत्र थैमान घालत असलेल्या कोविड-१९ अर्थात कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर सिडकोने आपल्या गृहनिर्माण योजनांतील घरांचे सर्व हफ्ते भरण्यासाठी अर्जदारांना आणखीन तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीची अंतिम मुदत आता ३० जून २०२० ऐवजी ३० सप्टेंबर २०२० अशी असणार आहे. परंतू अनेक सदनिका धारकांना त्यांच्या घरांचा जवळपास मोठा हिस्सा आधीच भरल्याचेही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे सिडकोच्या नव्या घरांच्या सोडतीही थांबवण्यात आलेल्या आहेत.
