कुख्यात डॉन छोटा राजन याचा मृत्यू, नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
नवी दिल्ली, दि.७: कुख्यात डॉन छोटा राजन याचा नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात कोविड संसर्गाने मृत्यू झाल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्स ने दिले असून दि. २६ एप्रिल पासून राजनवर उपचार चालू होते.
नोव्हेंबर २०१५ साली इंडोनेशियातील बाली येथून भारतात प्रत्यर्पण झाल्यापासून छोटा राजन तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होता. तिहार तुरुंगातच राजन याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर येथे सुरक्षेवर असलेल्या तुरुंग कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले गेले.
