चितळे समूहाचे संस्थापक काकासाहेब चितळे कालवश
पुणे: सबंध महाराष्ट्राला ज्यांच्या ‘बाकर वडीने’ व श्रीखंडाने वेड लावले त्या चितळे समूहाचे संस्थापक काकासाहेब चितळे यांचे मिरज येथे दुपारी साडेतीन च्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. त्यांच्यामागे त्यांच्या पश्चात पत्नी सुनिता चितळे, उद्योगपती गिरीश चितळे, मकरंद चितळे दोन मुले आणि मुलगी वीणा सहस्त्रबुद्धे, सूना नातवंडे असा परिवार आहे.