पूर्व चीनी समुद्रात असलेली सेन्काकू बेटे हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपानने फेटाळला
पूर्व चीनी समुद्रात असलेली सेन्काकू बेटे हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपानने फेटाळून लावला आहे. ऐतिहासिक काळापासून ही बेटे जपानचा भाग आहेत, असा दावा जपानी संरक्षण मंत्र्यांनी केला आहे.
या भागातला चीनी सैन्याचा वाढता हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग आहे, असं जपानने म्हटले आहे. आम्हाला शांतता हवी असली, तरी आमच्या भूभागाचे संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत याचा पुनरुच्चार जपानने केला आहे.
Source – AIR
