केंद्र सरकारद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या ५४ चिनी ऍप्सवर बंदी
राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका असल्याच्या कारणावरुन केंद्र सरकारनं ५४ चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे. यातील काही ऍप्स यापूर्वीही बंद करण्यात आली होती पण नाव बदलून तीच ऍप्स पुन्हा सुरु करण्यात आली होती. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानं मंत्रालयानं जारी केलेल्या यादीमध्ये ब्युटी कॅमेराः स्वीट सेल्फी एचडी, सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, विवा विडीयो एडिटर, ऍपलॉक आणि ड्युअल स्पेस लाईट या ऍप्सचा समावेश आहे. यापैकी अनेक ऍप्स एकतर धोकादायक सॉफ्टवेअर चालवत असत किंवा युजरची माहिती त्याच्या संमतीविना चिनमधील डाटा सेंटर्सकडे पाठवत असत.
