Chandra Patil twt
पराभव दिसू लागल्याने पवारांची माघार – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना स्वतःचा पराभव दिसू लागल्याने त्यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पार्थ पवार यांनीही आपल्या आजोबांचा आदर्श समोर ठेऊन आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घ्यावी; अन्यथा पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल, अशी टीका महसून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. करवीर विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युती मेळाव्यात ते बोलत होते. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या साडेचार वर्षांत केंद्र व राज्यातील सरकारने जनहिताच्या फायद्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. असेही ते म्हणाले. काश्मीर प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त भाजप सरकारमध्ये आहे. कलम ३७० हटवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांच्या मते, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युतीचे सर्वच उमदेवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. आगामी निवडणूक हि सर्व पक्षांसाठी धर्मयुद्ध असणार आहे.
