Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये” – अखेर केंद्र सरकारने जाहीर केले निर्देश

“शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये” – अखेर केंद्र सरकारने जाहीर केले निर्देश

नवी दिल्ली: आज सकाळीच महाराष्ट्र वार्ताने नवी मुंबईतील कोपर खैरणे विभागातील नॉर्थ पॉईंट शाळेची फीवाढी व फी साठीच्या तगाद्या संदर्भातील बातमी प्रकाशित केली होती. नेमकं आजच केंद्र सरकारनेही या विषयी संस्थाचालकांना लॉकडाऊन नंतरचे काही महिने फी भरण्याबाबत तगादा लावू नये असे निर्देश जाहीर केले आहेत.

महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. काही संस्थांनी असा तगादा लावल्याचं दृष्टीला आलं आहे, त्यामुळे शुल्क भरण्यासाठीच्या या मुदतवाढीबाबतची माहिती या सर्व महाविद्यालयं आणि संस्थांनी आपल्या संकेतस्थळांवर जाहीर करावी, तसंच विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे कळवावी, असं मनुष्य बळ विकास मंत्रालयानं कळवलं आहे. अध्यापक आणि कर्मचाऱ्यांचं या काळातलं वेतन दिलं जाईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. चालू सत्रासाठी संचारबंदीच्या काळात ऑनलाईन वर्ग चालू राहतील, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *