युरोपियन सेंट्रल बँकेतर्फे ११ वर्षानंतर प्रथमच व्याजदरात वाढ
युरोपियन सेंट्रल बँकेनं वाढत्या युरोझोन चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ११ वर्षानंतर प्रथमच व्याजदर वाढवले आहेत. युरो चलन वापरणार्या १९ देशांच्या मध्यवर्ती बँकांसाठी ECB ने गुरुवारी हा दर अर्ध्या टक्कयानं वाढविला.
२०१४ पासून बँक व्याज दर नकारात्मक असुन बॅंकानी पैसे जमा करण्याऐवजी कर्ज द्यावं यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे सर्व प्रयत्न असल्याचं बॅंकेच्या पत्रकात म्हटलं आहे. जूनला संपणाऱ्या १२ महिन्यांत बाजारभाव ८.६ टक्क्यांनी वाढले असून बँकेने अपेक्षा केलेल्या २ टक्के वाढीहुन ते जास्त आहेत.
ऊर्जा, इंधन आणि अन्नाच्या किंमती वाढत असून बँक ऑफ इंग्लंड आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हसह जगभरातल्या केंद्रीय बँका, किंमती वाढल्यानं दर वाढवत आहेत.
