Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

CBSE चा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; मुली ठरल्या सरस

CBSE चा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; मुली ठरल्या सरस

नवी दिल्ली: सीबीएससी च्या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज घोषित झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे. यंदा या परिक्षेत एकूण ८८ पूर्णांक ७८ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीपेक्षा ५ पूर्णांक ३८ शतांश टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गुणवत्ता यादी घोषित न करण्याचा निर्णयही बोर्डानं घेतला आहे. यंदा ज्या विषयांच्या परिक्षा रद्द झाल्या होत्या त्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी गुण बहाल करण्यात आले आहेत.

हे निकाल www.cbseresults.nic.in , www.cbse.nic.in आणि www.results.nic.in. या संकेतस्थळावर पाहाता येणार आहेत. हा निकाल दुरध्वनीच्या माध्यमातून 011- 24300699 या क्रमांकावरही मिळू शकेल.

Surve – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *