‘सीबीएसई’ बोर्डचा बारावीच्या परिक्षेबाबत महत्वपूर्ण खुलासा
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने(CBSE) बारावीच्या परीक्षा रद्द केलेल्या नाहीत. या बद्दलच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, याबाबत कोणताही निर्णय घेतल्यास त्याविषयी नागरिकांना अधिकृतरित्या माहिती देण्यात येईल, असं सीबीएसईनं आज स्पष्ट केलं.
सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांद्वारे पसरल्याच्या पार्श्वभूमीवर मंडळानं आज हा खुलासा केला.
Credits – AIR
