सीबीएसई चे १० वी च्या न झालेल्या परीक्षांचे निकाल २० जूनला जाहीर होणार
नवी दिल्ली, दि.३: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता १० वी च्या परीक्षांचे निकाल २० जून २०२१ रोजी जाहीर करणार आहे.
मंडळाने गुणांकन पद्धती आणि वेळाचे नियोजन कसे असेल या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. शाळांना या परिपत्रकानुसार मूल्यमापन करून ५ जूनपर्यन्त मंडळाला गुणपत्रिका सादर करायच्या आहेत. त्यानंतर २० जून रोजी निकाल जाहीर होतील. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यानंतर मंडळानं अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर गुण देण्याचं निश्चित केलं.
