सीबीआयने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या विरुद्ध आरोपपत्र केले दाखल
शेअर बाजाराची गोपनिय माहिती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने काल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी व्यवस्थापकीय संचालक, चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे माजी समूह संचालन अधिकारी आनंद सुब्रमण्यन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. सीबीआयने सुब्रमण्यम आणि चित्रा यांना अनुक्रमे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये या प्रकरणी अटक केली होती. सेबीच्या अहवालानंतर ही कारवाई केली गेली, ज्यामध्ये सुब्रमण्यम यांची बेकायदेशीर नियुक्ती केल्याप्रकरणी आणि “हिमालय योगी” सोबत शेअर बाजारासंबंधित गोपनीय माहिती सामायिक केल्याबद्दल चित्रा रामकृष्ण यांना दोषी ठरवले आहे. सीबीआयचा आरोप आहे की, चित्रा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला.
