मुंबईतील CBI कार्यालयात ६८ जणांना कोरोनाची लागण
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुंबई कार्यालयातल्या ६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व बाधितांना सध्या गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचं कार्यालय मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. एका अधिकाऱ्यानं हिंदुस्तान समाचार या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की कार्यालयात काम करणाऱ्या २३५ जणांना कोरोना चाचणी करण्यास सांगितलं होतं. त्यापैकी ६८ जण बाधित आढळले आहेत.
