मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी
मुंबई, दि. ९: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबई शहर तसंच शेजारच्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातली २० हजाराहून अधिक खारफुटीची झाडं तोडायला मुंबई उच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. २०१८ मध्ये उच्च न्यायालयानं एका आदेशान्वये राज्यातील खारफुटीची झाडं तोडण्यावर बंदी घातली होती.
मात्र कोणत्याही सार्वजनिक प्रकल्पांसाठी झाडे तोडायची असतील तर प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाकडून परवानगी घेण्याची मुभा दिली होती. त्यानुसार नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशननं मुंबई शहर तसंच शेजारच्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील खारफुटीची झाडं तोडण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या पीठानं त्यांचा हा परवानगी अर्ज आज मंजूर केला आहे.
