दहशतवादासंदर्भात शून्य सहिष्णूतेचे धोरण सुनिश्चित करण्याचे आवाहन
ब्राझीलमध्ये रिओ द जानेरो येथे सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत ‘द लीडर्स डिक्लेरेशन’ या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मिर येथे, २६ नागरिकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सीमापार दहशतवाद, दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा आणि सुरक्षित आश्रयस्थान या सर्व स्वरुपातल्या आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याप्रती ब्रिक्स नेत्यांनी आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. दहशतवादासंदर्भात शून्य सहिष्णूतेचे धोरण सुनिश्चित करण्याचे तसेच दहशतवादाचा सामना करण्यामधील दुहेरी निकषांना नाकारण्याचे आवाहन केले.
या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरुवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या धोक्याचा मुद्दा उपस्थित करत पहलगाम हल्ल्याच्या तीव्र निषेधाबद्दल आणि भारताविषयी एकजूट दाखवल्याप्रती, ब्रिक्स सदस्य देशांचे आभार मानले. भारताची ओळख, प्रतिष्ठा यांच्यावरील हा हल्ला होता असे सांगून हा हल्ला केवळ भारतावर नसून मानवतेवरील हल्ला असल्याचं प्रतिपादन त्यांनी केल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या सत्रामध्ये, भारत संघर्ष सोडवण्यासाठी आणि जागतिक शांतता प्रस्थापित कऱण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीतीचे समर्थन करत असल्याचं पंतप्रधानांची स्पष्ट केलं.
Source – AIR
