आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार डच लेखिका मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना घोषित
२०२० वर्षासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार २९ वर्षीय डच लेखिका मारिएक लुकास रिसनेवेल्ड यांना घोषित झाला आहे. बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या लेखिका ठरल्या आहेत.
नेदरलँडमधल्या ग्रामीण भागातील एका धार्मिक शेतकरी कुंटुबाच्या कहाणीवर आधारित “द डिसंकफर्ट ऑफ ईवनिंग” या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची ५० हजार पाउंड रक्कम लेखिका आणि अनुवादक मिशेल डचिंसन यांच्यात विभागून दिली जाणार आहे.
Source – AIR
