काळवीट शिकार प्रकरणी ह्या बॉलिवूड कलाकारांना जोधपूर हायकोर्टाच्या नोटीस
बहुचर्चित राजस्थानातील काळवीट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या बॉलिवूड कलाकार
सैफ अली खान, दुष्यंत सिंह, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांना राजस्थान हायकोर्टाने नोटिस बजावली आहे. सत्र न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केल्यावर राजस्थान सरकारने उच्च न्यायालयात त्याविरोधात धाव घेतली.
बरोबर २१ वर्षांपूर्वी १९९८ साली ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या दरम्यान राजस्थानात वास्तव्यास असताना सलमान खान, सैफ अली खान, दुष्यंत सिंह, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे शिकारीला गेले होते. त्यावेळी त्यांनी एका काळविटाची शिकार केली होती. ह्या शिकारीनंतर तेथील बिष्णोई समाजाने निषेध नोंदवल्यानंतर सलमान खान सह अन्य सहकलाकारांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. पुढे काही वर्षांनी ह्यातील सलमान सोडून अन्य आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले. सलमान खानला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली दोषी ठरवून ६ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. सध्या सलमान खान जामिनावर आहे.
