Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बीएमसी अधिकाऱ्याला फेरीवाल्याकडून १२ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

बीएमसी अधिकाऱ्याला फेरीवाल्याकडून १२ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

मुंबई: पनवेल येथे वास्तव्यास असलेले मुंबई महानगर पालिकेतील परवाना निरीक्षक संजीव वालचंद्र रहाटे याला काल दि. २८ रोजी लाचलुचपत विभागाने एका फेरीवाल्याकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सदर फेरीवाल्याची हात गाडी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केली होती.

‘एसीबी’ च्या सूत्रांकडून कळले की मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील “आर” दक्षिण विभागात कार्यरत असलेल्या परवाना निरीक्षक संजीव वालचंद्र रहाटे याने एका फेरीवाल्याकडे त्याची अतिक्रमण कारवाईत जप्त केलेली हातगाडी सोडवण्यासाठी १२,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यावेळी फेरीवल्याने ‘एसीबी’ कडे रीतसर तक्रार दाखल केली होती. काल या फेरीवाल्याकडून वॉर्ड ऑफिस मध्ये लाच घेताना आधीच सध्या वेशात असलेल्या लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रहाटे ला रंगेहात पकडलं. यावेळी संध्याकाळी उशिरा नवीन पनवेल येथील त्याच्या घरीचीही ‘एसीबी’ ने ४ तास झडती घेतली होती. कांदिवली भागात राहणाऱ्या या फेरीवाल्याची याच विभागात फळे व भाजीपाला विकण्याची हातगाडी होती. दिवसा ढवळ्या पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्येच लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला पकडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *