मुंबई महानगरपालिकेकडून ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये मालमत्ता कराचं संकलन
मुंबई, दि. १: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराचं २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये संकलन झालं आहे. निर्धारित ४ हजार ८०० कोटी रुपयांच्या तुलनेत ७७५ कोटी रुपयांनी म्हणजेच १६ पूर्णांक १४ शतांश टक्के अधिक कर संकलन झालं आहे. नागरिकांनी मालमत्ता कर वेळेत महानगरपालिकेकडे जमा करावा यासाठी करनिर्धारण आणि सकंलन खात्यानं वर्षभर सातत्याने प्रयत्न केले.
सुयोग्य नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणी यामुळे निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक कर संकलित झाल्याबद्दल चहल यांनी करनिर्धारण आणि संकलन खात्यातले अधिकारी, कर्मचारी आणि विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत सर्वांचं अभिनंदन केलं आहे.
