“तुमच्या वर आमची करडी नजर आहे”; मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा
मुंबई: सध्या मुंबईकर कोरोनाशी लढत असून याकामी महापालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. पण आड काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बाबत एक ट्विट करत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत त्यांना एकच इशारा आहे तुमच्या वर आमची करडी नजर आहे हे करोना चे संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्या शिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही.”
दोन दिवसांपूर्वीही संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका व राज्य सरकारचे रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. यावेळी त्यांनी कोविड रुग्णालयांतील वास्तव समोर आणले होते.
