तबबा ४५ हजार कोटींहून अधिक रकमेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडून सादर
मुंबई, दि.३: मुंबई महानगर पालिकेचा २०२२-२३ या वर्षाचा ४५ हजार १४९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी आज स्थायी समितीला सादर केला. कोरानाच्या काळात सादर झालेल्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६ हजार ९१० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या पालिकेच्या अर्थसंकल्पामधला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी ३२ हजार कोटी, आरोग्य सेवेवर २ हजार ६५० कोटी, रस्त्यांच्या विकासासाठी २ हजार २०० कोटी, पूल बांधणी आणि पूलांच्या दुरूस्तीसाठी १ हजार ५७६ कोटी रुपये, गोरेगाव लिंक रोडसाठी १३०० कोटी तर विकास नियोजनासाठी १ हजार २ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
