मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठीच्या पदभरतीतील अन्यायकारक अट रद्द
मुंबई, दि. ११: बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी, दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावं, या अटीतली ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह, नवीन जाहिरात प्रसिद्ध करुन येत्या पंधरा दिवसांत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार असल्याचं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्यानं अर्ज करण्याची आवश्यकता नाही, त्यांचे अर्ज पुढच्या भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
कार्यकारी सहाय्यक लिपिक पदभरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्यावर यातील ‘या’ विशेष अटीवर विविध स्तरावरून निषेधाचे सूर येत होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली. अखेर मुंबई महानगर पालिकेला उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा हि अट रद्द करावी लागली.
