Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार” भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन

“मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार” भाजपकडून मंदिरं उघडण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन

मुंबई/पुणे, दि. १३: ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरं सुरू करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर घंटानाद तर पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराबाहेर वाद्यांचा गजर करत भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

राज्यात अनलॉक धोरणानुसार टप्प्या-टप्प्याने हॉटेल्स, बार, मॉल सुरू झाले पण मंदिरं सुरू करण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत भाजपने हे राज्यव्यापी आंदोलन छेडलं. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दारात केलेल्या घंटानाद आंदोलन प्रसंगी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, पक्षाचे आमदार, खासदार व नगरसेवक उपस्थित होते. मुंबई पुण्यासोबतच सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी तसेच पंढरपुरातही भाजप नेते-कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. संघ-भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील वर्धा रोडवरील आंदोलनात दिल्या जाणाऱ्या घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी “मंदिरे बंद, उघडले बार, उद्धवा बेधुंद तुझे सरकार” अशा काहीशा खोचक घोषणा देत परिसर निनादून सोडला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *