भारताच्या फुलराणीने हाती धरलं कमळ; बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजप प्रवेश
नवी दिल्ली: भारताची फुलराणी बॅडमिंटन पटू सायना नेहवाल हिने आज नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी ती म्हणाली की, “आज मी आज अशा पक्षात प्रवेश करत आहे जो देशासाठी उत्तम काम करत आहे. मोदीजींनी भारतात खेळासाठी खुप काम केलं असून ‘खेलो इंडिया’ सारखे उपक्रम सुरू केले आहेत.”
