जननायक बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आदरांजली
नवी मुंबई, दि. १६: आदिवासी समाजातील दूरदर्शी स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे प्रतिमापूजन करून बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
१५ नोव्हेंबर १८७५ मध्ये जन्म झालेल्या बिरसा मुंडा यांनी इंग्रजांकडून होणारे अत्याचार पाहून इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात १८९५ च्या सुमारास लढा पत्करला. इंग्रजांनी अटक केल्यानंतर तुरूंगात अन्वनीत छळ होऊनही त्यांनी आपला लढा काही सोडला नाही. पाणी, जंगले व जमीन ही नैसर्गिक संसाधने वाचविण्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले. त्यासोबतच सामाजिक परंपरांची जपणूर व महिलांचे संरक्षण याविषयी त्यांनी आग्रही भूमिका घेत काम केले. अशा समाजाने ‘जननायक’ म्हणून गौरविलेल्या आदिवासी समाजक्रांतीचे जनक स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त त्यांस नवी मुंबई महानगरपालिकेत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
