महाराष्ट्रासह ‘या’ दहा राज्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि केरळ या दहा राज्यांतील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्ल्यू पसरला असून १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कावळे, स्थलांतरीत पक्षी आणि वन्य पक्षी यांच्यातही बर्ड फ्ल्यूचा संसर्ग पसरल्याचे पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने म्हटले आहे.
हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, बिहारसह मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा आणि केरळ अन्य पक्ष्यांमध्येही या रोगाचा संसर्ग झाला आहे.
हरयाणा, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या सर्वात जास्त प्रसार असलेल्या राज्यांमध्ये या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
