बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण
बिहार विधानसभा निवडणुकांच्या उद्यापासून होणाऱ्या मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अत्यंत व्यापक अशी ही व्यवस्था असून मतमोजणीसाठी राज्यातील ३८ जिल्ह्यात ५५ मतमोजणी केंद्र उभारण्यात आली आहेत.
मतमोजणी शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर निम लष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेसाठी तीन टप्प्यात मतदान घेण्यात आलं होतं.
