‘ही’ फेसबुक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेच्या अंगलट; भांडुप पोलिसांनी दाखल केला गुन्हा
मुंबई: फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणे अभिनेत्री केतकी चितळेच्या अंगलट आले आहे. रविवारी दि. १ मार्च रोजी अभिनेत्री केतकी चितळे हिने एक फेसबुक पोस्ट टाकली होती ज्यावर उलटसुलट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. सदर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(खरात) चे मुंबई अध्यक्ष असलेले राजू थाटे यांनी भांडुप पोलीस स्थानकात तिच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पहा नेमकं काय म्हणाली होती केतकी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये
“आपल्या देशात,
√ तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातलीत तर ते धर्म स्वातंत्र आहे.
√ किरपान (एक छोटा चाकू) सिखानी ठेवला, तर ते धर्मात लिहीलय.
√ आम्ही कंदमूळ खाणार नाही, म्हणून जैन मेनू वेगळा असतो, ते धर्म पालन.
√ अग्नी मंदिर फक्त आमचे प्रार्थना स्थान आहे, दुसऱ्याना परवानगी नाही त्याच्याजवळ यायची, असं म्हणत पारसी आपला धर्म जपतात.
√ चर्च मधील फादर, फक्त यशु बद्दल नव्हे तर राजकारण आणि बाकी धर्म (एक टारगेट धर्म, समजून घ्या कुठला) कसे वाईट, यावर भाष्य करतात, पण ते त्यांचं सरमन म्हंटलं जातं.
√ नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क.
आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.
ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की ‘मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू’ असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय.
जागे व्हा जरा.
मी सर्वप्रथम एक भारतीय आहे,
मी हिंदू विचारसरणीचे पालन करते.
मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे.”
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10163278056945051&id=812055050
