मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून निरोप
मुंबई, दि. १७: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
