‘ती’ अफवाच बँकाकडून कोणतीही शुल्क वाढ नाही
काही सार्वजनिक बँका बचत खात्यांमधून पैसे काढताना अथवा पैसे भरताना त्यावर अधिक दर आकारण्याचा विचार करत आहे, अशा प्रकारची माध्यमांवरची बातमी पूर्णतः खोटी असल्याचे पत्र सूचना कार्यालयाने म्हटले आहे. बँकांनी अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पत्र सूचना कार्यालयाने म्हटले आहे.
जनधन खात्यामधून पैसे काढताना शंभर रुपये आकारले जातील, अशा आशयाची बातमीही पत्र सूचना कार्यालयाने फेटाळली आहे. ही केवळ अफवा असून जनधन खात्यावर पैसे काढताना कोणतीही फी आकारली जाणार नाही, असे पत्र सूचना कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
