बजाज कंझ्युमर केअरने आणला बजाज १०० टक्के शुद्ध ‘हिना’ नावाने मेहंदी चा नवा ब्रॅंड
मुंबई, दि. २३: बजाज कंझ्युमर केअरने २० जून रोजी बजाज १०० टक्के शुद्ध मेहंदीचा ‘हिना’ हा ब्रॅण्ड बाजारात आणला आहे. उत्कृष्ट दर्जाच्या मेहंदीच्या पानांपासून बनविलेले आणि पुर्णपणे रसायनविरहीत असलेले हे उत्पादन १०० टक्के नैसर्गिक आणि पूर्णपणे सुरक्षित आहे. हि मेहंदी हाता आणि पायांवर देखील वापरता येऊ शकते आणि ती खरोखर बहुउद्देशीय सौंदर्य आविष्काराचा अविभाज्य घटक ठरली आहे.
बजाजची १०० टक्के शुद्ध मेहंदी हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. हि मेहंदी ग्राहकांना त्यांच्या केसांना कंडीशन करण्यासाठी तसेच समृद्ध नैसर्गिक रंग प्रदान करण्यासाठी १०० टक्के नैसर्गिक आणि एक आरोग्यदायी उपाय म्हणून तयार केलेली आहे.
“हिना ब्रॅण्ड भारतातील पारंपारिक सौंदर्य पद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि आम्ही एक पूर्णपणे नैसर्गिक आणि सुरक्षित उत्पादन म्हणून बजाजची १०० टक्के शुद्ध मेहंदी सादर करताना खूपच आनंदित आहोत,” अशी टिप्पणी करत बजाज कंझ्युमर केअरचे व्यवस्थापकीय संचालक जयदीप नंदी पुढे म्हणाले की, “बजाज ब्रँड हे नाव अनेक दशकांपासून लाखो भारतीयांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. हे उत्पादन आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण परंतु नैसर्गिक आणि सुरक्षित अशी उत्पादने प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा परिपाक आहे. बजाजच्या १०० टक्के शुद्ध मेंदीसह नैसर्गिक आविष्काराचा, चांगुलपणाचा अनुभव घ्या आणि तुम्हालाही तो नक्कीच आवडेल.”
बजाज १०० टक्के शुध्द हिना खालील प्रकारांमध्ये देशातील सर्व आघाडीच्या स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल:
२५ ग्रॅमचे पॅकेट: किंमत रु. १०
७५ ग्रॅम पॅकेट: किंमत रु. ३५
आधुनिक ट्रेड ई-कॉमर्स चॅनेलसाठी खास पॅकेट्स लवकरच बाजारात आणले जाणार आहेत. आधुनिक व्यापार पध्दतीमध्ये हायपर मार्केट, सुपरमार्केट चेन आणि मिनीमार्केट या प्रकारांचा समावेश होतो.
बजाज १०० टक्के शुद्ध मेहंदी तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या काटेकोर उत्पादन प्रक्रियेतून गुणवत्ता आणि ग्राहकांच्या समाधानाप्रती बजाज कंझ्युमरची वचनबद्धता दिसून येते. मेहंदी नैसर्गिक चांगुलपणा आणि तिची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक पॅक काळजीपूर्वक तयार केला जातो आणि हा पॅक सातत्याने उच्च-गुणवत्तेच्या उत्पादनाचे आश्वासन देतो.
