बडोदा बीएनपी परिबा मल्टीकॅप फंडाने गाठले दोन मोठे टप्पे २१ वा वर्धापन दिन साजरा करताना एयूएमने ओलांडला २,५०० कोटी रुपयांचा टप्पा
मुंबई, दि. १९: बडोदा बीएनपी परिबा मल्टीकॅप फंड आपला २१ वा वर्धापनदिन साजरा करत असताना या फंडाच्या मालमत्ता व्यवस्थापन निधीने (एयूएम) अडीच हजार कोटी रुपयांच्या महत्वाचा टप्पा ओलांडला आहे. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅफ समभागांच्या मिश्रणाआधारे संतुलित पोर्टफोलिओसाठी प्रसिध्द असलेल्या या फंडाने आपल्या आधारभूत निर्देशांकाच्या तुलनेत अल्प आणि मध्यम कालावधीसाठी (एक आणि तीन वर्ष अनुक्रमे) सातत्याने सरस कामगिरी बजावली आहे.
भरभक्कम परतावा हवा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी बडोदा बीएनपी परिबा मल्टीकॅप फंड हा त्याच्या आरंभापासून एक आकर्षक गुंतवणूक पर्याय ठरला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) च्या माध्यमातून दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक त्यात केली असती, तर आज या गुंतवणूकीचे मूल्य १.५८ कोटींहून अधिक झाले असते. फंडाचा १.११ चा शार्प रेशो जोखीम-समायोजित परतावा देण्याची फंडाची मजबूत क्षमता दर्शवितो, तर फंडाचा एकपेक्षा कमी असलेला बीटा गुणांक हे सूचित करतो की, बाजारातील घसरणीवेळी निर्माण झालेल्या जोखीमेला मयार्दीत पातळीवर राखत उत्तम परतावा मिळवून दिलेला आहे. या योजनेची कामगिरी म्हणजे म्युच्युअल फंडाच्या ‘टूगेदर फॉर मोअर’ या ब्रँड अभिवचनाचा भरभक्कम पुरावा आहे.
बडोदा बीएनपी परिबा मल्टीकॅप फंड मल्टी-कॅप इंडेक्स जगताचा लाभ उठवितो. हा फंड व्यवस्थापकांना प्रामुख्याने मीडिया, टेक्सटाइल आणि नैसर्गिक वस्तू (फॉरेस्ट मटेरिअल्स) यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता प्रदान करतो. या क्षेत्रांचा सहसा लार्ज-कॅप इंडेक्समध्ये समावेश नसतो. अशा रितीने ही व्यापक वैविध्यता फंडाला वैशिष्टपूर्ण वाढीच्या संधींचा लाभ घेण्यास सक्षम बनविते. त्याचबरोबर विविध आर्थिक चक्रांमध्ये असलेल्या जोखीमासुध्दा कमी करण्याची ताकद प्रदान करते.
सुमारे ४० ते ६० समभागांचा मिळून वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ साकारण्याचे उद्दिष्ट असलेली ही योजना, विविधीकरणासह वाढीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांसाठी, एकाच फंडाव्दारे भांडवली बाजारात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या नवगुंतवणूकदारांसाठी त्याचबरोबर भारताच्या दमदार आर्थिक वृध्दीच्या यशोगाथेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आदर्श पर्याय आहे. ही एक प्रमुख योजना असून निधी व्यवस्थापक श्री. चावला हे या योजनेचे व्यवस्थापन सांभाळत आहेत.
