अयोध्येतील राम मंदिराचा नकाशा अखेर मंजूर
उत्तर प्रदेश दि. ३: उत्तर प्रदेशात अयोध्या इथं प्रस्तावित असलेल्या राम मंदिराचा नकाशा आणि संपूर्ण मंदिर परिसराचा आराखडा अयोध्या विकास प्राधिकरणानं आज एकमतानं मंजूर केला आहे. त्यामुळे या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता हे बांधकाम केव्हाही सुरू होईल. मंदिर परिसराकरिता २ लाख ७४ हजारहूनन अधिक चौरस मीटर्स आणि राम मंदिरासाठी १३ हजार चौरस मीटरचा आराखडा तयार करण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्क्ष क्षेत्राचे सदस्य अनिल मिश्रा यांनी २९ ऑगस्ट रोजी आवश्यक कागदपत्रांसह हा नकाशा मंजुरीसाठी सादर केला होता.
Source – AIR
