Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘या’ मान्यवरांना जाहीर झाले सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार

‘या’ मान्यवरांना जाहीर झाले सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार

मुंबई, दि. २३ : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०१९ आणि २०२० या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तनासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरीसाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्यासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीतासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.तमाशासाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार  सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन २०१९ साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर सन २०२० साठीचा पुरस्कार  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *