Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

औरंगाबाद शहरात ९ ते १२ जानेवारी दरम्यान होणार ‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ औद्योगिक प्रदर्शन

औरंगाबाद शहरात ९ ते १२ जानेवारी दरम्यान होणार ‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ औद्योगिक प्रदर्शन

औरंगाबाद शहरातल्या चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या, कलाग्राम आणि गरवारे क्रीडांगणावर येत्या ९ ते १२ जानेवारी दरम्यान ‘ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो २०२०’ हे औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रिकल्चर, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रदर्शनात मराठवाड्याबरोबरच राज्य आणि परराज्यातील, ४४४ उद्योग आपली उत्पादने प्रदर्शित करणार असल्याचं ते म्हणाले.

या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, तर समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

(Credit – AIR)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *