कोट्यवधी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स प्रकरणी दोघांना जीएसटी औरंगाबाद शाखेकडून अटक
औरंगाबाद, दि. २ : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयाचा इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत सरकारी फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना वस्तू आणि सेवा कर विभागाच्या औरंगाबाद शाखेनं ताब्यात घेतलं. फरहत इंटरप्राईजेस या कंपनीनं अस्तित्वात नसलेल्या ३५ हून अधिक आस्थापनांच्या नावाने ५०० कोटीहून अधिक रकमेची बनावट देयके सादर करुन त्याद्वारे इनपूट टॅक्स क्रेडिट मिळवत असल्याची माहिती जीएसटी पथकाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
फजल अब्दुल गफ्फार मेवावाला आणि मोहम्मद अजीज मोहम्मद फकीर अशी त्यांची नावं असून, या आरोपींकडून बनावट पॅन कार्ड, आधार यासह इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Source – AIR
