Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शितळादेवीनगर-महाळुंगे परिसरातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घेतली सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट

शितळादेवीनगर-महाळुंगे परिसरातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घेतली सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांची भेट

पुणे, दि. २२: काल गुरुवार, दिनांक २१ डिसेंबर २०२३ रोजी शितळादेवीनगर असोसिएशन, महाळुंगे मधील रॉयल सिरीन सोसायटी, इक्विलाइफ होम्स सोसायटी आणि स्काय बे सोसायटी मधील सभासदांनी औंध क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांना भेटून शितळादेवीनगर महाळुंगे परिसरातील असलेल्या सफाई, सांडपाणी, कचरा, अतिक्रमण, मोकाट डुक्कर यांसारख्या अनेक समस्यांबाबत निवेदन देत चर्चा केली. सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी पुढील काही दिवसांत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसमवेत सदर परिसरास भेट देणार असल्याचे यावेळी सांगितले. सदर प्रसंगी विठ्ठल पडवळ, आदित्य खाडे, अभिजीत चौगुले (इक्विलाइफ होम्स सोसायटी) स्वानंद धोंडसे, हितेश माने, आकाश खापरे ( रॉयल सिरीन सोसायटी) आणि संतोष गायकवाड (स्काय बे सोसायटी) आदी सभासद उपस्थित होते

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *