Narendra Modi Tweeter
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत, 5 जवान जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.
तसेच नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की “पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेला हल्ला हा घृणास्पद आहे. मी या भ्याड हल्लाचा निषेध करतो. आपल्या जवानांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही समस्त भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून ह्या शूर हुतात्म्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत”
Attack on CRPF personnel in Pulwama is despicable. I strongly condemn this dastardly attack. The sacrifices of our brave security personnel shall not go in vain. The entire nation stands shoulder to shoulder with the families of the brave martyrs. May the injured recover quickly.
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2019
