अटल टनलला आयबीसी’चा सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प पुरस्कार जाहीर
बीआरओ म्हणजेच, सीमा रस्ते संघटनेने, हिमाचल प्रदेशात रोहतांग इथे बांधलेल्या, स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमूना असलेल्या अटल बोगदा, इंडियन बिल्डिंग कॉँग्रेस-म्हणजेच आयबीसी च्या यंदाच्या, “सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा प्रकल्प पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. आज नवी दिल्लीत या बोगद्याला हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी, ३० पेक्षा अधिक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना नामांकन मिळाले होते. मात्र, आयबीसीच्या ज्यूरीने त्यातून, या प्रकल्पाची निवड केली, कारण, या प्रकल्पाची बांधकाम प्रक्रियाही सर्वोत्तम ठरली. आयबीसी च्या आज झालेल्या २५ व्या वार्षिक परिषदेत, बीआरओचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी या पुरस्कार स्वीकारला मनाली ते लाहौल स्पिती व्हॅली दरम्यानचा हा बोगदा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत नमूना समजला जातो.
या बोगद्यामुळे, लष्करी दलांना लद्दाखला पोहोचण्यासाठी एक उत्तम पर्यायी मार्ग तर उपलब्ध झालाच आहे,त्याशिवाय, लाहौल स्पिती च्या लोकांसाठी देखील वाहतुकीचा उत्तम मार्ग निर्माण झाला आहे, असे चौधरी यांनी सांगितले. नव्या ऑस्ट्रेलियन बोगद्याच्या पद्धतीनुसार, हा बोगदा बांधण्यात आला असून, ३ ऑक्टोबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या बोगद्याचे राष्ट्रार्पण केले होते.
