अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविड लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) केले ‘हे’ आवाहन
अॅस्ट्राझेनेका कंपनीने तयार केलेल्या लशीमुळे रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचं कुठेही निदर्शनास आलेलं नसल्यानं, तशी भीती बाळगून कोणत्याही देशाने या लसीचा वापर थांबवू नये, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केलं आहे.
रक्तात गुठळ्या निर्माण होण्याचं प्रमाण वाढण्याचा आणि लसीचा कोणताही संबंध नाही, असं या संघटनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मार्गारेट हॅरीस यांनी स्पष्ट केलं.
अॅस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर काही जणांच्या रक्तात गुठळ्या निर्माण झाल्याच्या वृत्तानंतर अनेक युरोपीय देशांनी या लशीचा वापर तात्पुरता स्थगित केला आहे.
