मला नाही माहीत की मी अरविंद केजरीवाल यांना कानाखाली का मारलं : सुरेश
दिल्ली: दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोती नगर परिसरात ४मे रोजी रोड शो दरम्यान सुरेश नामक एका युवकाने कानशिलात लगावली होती. आता एका आठवड्या नंतर या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. दिल्ली च्या मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावणाऱ्या या युवकाने एका वृत्त संस्थेशी बोलताना आपल्या या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.
त्याच बरोबर तो म्हणाला की, “मला नाही माहीत की मी अरविंद केजरीवाल यांना कानाखाली का मारलं? मी यासाठी माफी मागू इच्छितो.” सध्या या विषयात आरोपी सुरेश चा दावा आहे की तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. मला हे कृत्य करण्यासाठी कोणीही प्रोत्साहित केलेलं नाही असंही तो म्हणाला. तसेच पोलिसांनीही त्याच्याबरोबर कसलाही त्याला कशाहीप्रकारचा त्रास दिला नाही
