अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्ही च्या अर्णब गोस्वामी यांना अखेर अटक
मुंबई/अलिबाग: रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग व मुंबई पोलिसांनी एकत्र कारवाई करत आज पहाटे अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथील आपल्या फार्महाऊस वर आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेय पत्रात त्यांनी अर्णब गोस्वामी यांनी आपले पैसे थकवल्याचा आरोप केला होता. आज पहाटे पोलीस घरी पोहोचल्यावर आधी अर्णब यांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. अखेर दीड तासाने हे नाट्य संपल्यावर अर्णब यांना पोलीस व्हॅन मध्ये कोंबण्यात आले.
या प्रकरणी महाराष्ट्र वार्ताने व काही मोजक्या माध्यमांनी वेळोवेळी बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. मधल्या काळात शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी दिवंगत अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत भेट घडवून आणली होती. अखेर आज अर्णब यांच्यावर अटकेची कारवाई झाली. अलिबाग येथील न्यायालयात त्यांना हजर केले जाणार असून अलिबाग पोलिस त्यांच्या रिमांड ची मागणी करणार असल्याचे कळते.
