आता हरियाणातील भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ७५ आरक्षण; कायद्यावर झाले शिक्कामोर्तब
हरियाणा: हरियाणाच्या राज्यपालांनी स्थानिक नागरिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये ७५ टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्यावर काल शिक्कामोर्तब केले. स्थानिक तरुणांना आरक्षण देण्याचे आमचे वचन आम्ही पाळले आहे, असे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांनी म्हटले आहे.
५० हजार रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये हे आरक्षण असणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादी सादर करणे खाजगी आस्थापनांना बंधनकारक करण्यात आले असून नियमाचा भंग केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
