अशोक डक यांनी काल आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला होता
नवी मुंबई, दि. २२: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा पणन संचालकांकडे पाठवला असून तो मंजूरही झाला आहे. आता सभापती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. ६ महसूल विभागातून प्रत्येकी २ असे १२ शेतकरी प्रतिनिधी संचालक म्हणून निवडून आले होते. त्यापैकी ७ जणांची त्यांच्या बाजार समितीतील मुदत संपली आहे. त्यामुळे हे सात जण संचालक पदासाठी अपात्र ठरले होते मात्र या संचालकांनी न्यायालयाकडून मुदतवाढ मिळवली आहे. संचालक पद रद्द करण्याच्या निर्णयाला पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढची सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली होती. यावर सुनावणी होणार होती मात्र सुनावणी होण्याआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनी राजीनामा दिला आहे.
