कधीही अटक होण्याची शक्यता
मुंबई, दि.६: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यविरोधात ईडी अर्थात, सक्तवसुली संचालनालयानं लुकआऊट नोटीस काढली आहे. ईडीनं अनेकदा समन्स बजावूनही अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांनी देशाबाहेर जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर सीबीआयनं देशमुख यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर इडीनंही त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं देशमुख यांना हंगामी जामीन द्यायलाही नकार दिला आहे.