‘सीबीआय’ने सुशांतसिंत राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अहवाल लवकरात लवकर जाहीर करावा- अनिल देशमुख
केंद्रीय अन्वेषण संस्थेनं सुशांतसिंत रजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अहवाल लवकरात लवकर जाहीर करुन त्याचा मृत्यू हा खून आहे की आत्महत्या याचा उलगडा करावा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
काल वार्ताहारांशी बोलताना देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देऊन पाच ते सहा महिन्याचा कालावधी उलटला असल्याकडे लक्ष वेधलं.
